शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

हरिश्चंद्र गड with ” टेक्नो ट्रेकर्स” १५-१६ ऑक्टोबर २०११

हरिश्चंद्र गड

मी ऐकलेला सर्वात सुंदर गड, ( आणि फोटोंमध्ये बघितलेला )

गडावर जायची फारच इच्चा होती , आणि fianally ती पूर्ण झालीच. thnx २ “tecno trekkers ” :D + YZ (जीवेश) आणि सर्व सहभागी मित्र + किरण ( missed you यार, n missed अमोल too :( )

तर, हरिश्चंद्र गडाचा प्लान खु ssss प आधी पासून ठरलेला, एवढंच काय तर दोनदा cancel झाला ( एकदा तर मी शूज घालून तयार पण झालो होतो , आणि घराच्या बाहेर पडण्या आधी प्लान cancel :( ) झाल्याचा call आला …………. असुदे forget it ), ह्या वेळेला प्लान करण्यात पुढाकार घेतला तो किरणने. अगदी राजगड च्या झाकास्स्स्स ट्रेक लाच ह्या गडाचा प्लान ठरला होता. किरणने तर फेसबुक वर event पण create केला. आणि नेमकी ह्याच आठवड्यात किरण ची तब्येत ठीक नसल्याने तो cancel झाला , तसेच अमोल आणि नऱ्या पण त्यांच्या deputation मुळे cancel झाले :( , ह्या वेळी खूप जनांनी येण्याची तयारी दर्शवल्याने बस ठरवण्यात आली., पण शेवटी फक्त १२ जण आली ( एका दृष्टीने बर झाल, कारण बस मध्ये जागा ऐस पैस होती)

ट्रेक ची सुरुवात झाली मालाड ला सुन्याच्या घरापासून, मी आणि अंकुश सुन्याच्या घरी रात्री ११ ला पोचलो , तिथे संतोष आधी पासून हजर होता, आणि बस पण थोड्याच वेळात आली, ट्रेक ची सुरुवात संतोष येडकेच्या हस्ते नारळ फोडून केली . पहिला stop होता आदीचा pickup , त्याला पार्ल्याला pickup केल , नंतर sion ला किरण medical kit व sliping mat घेऊन आला, त्यानंतर एका एकाला घेत सर्व १२ जण बस मध्ये बसलो

YZ (जीवेश ) ६ बीअर च्या बाटल्या घेऊन आला तेही रात्री १.३० च्या आसपास , आता त्या त्याने कश्या मिळवल्या कोणास ठाऊक ( कृपया वाईट अर्थ काढू नये …LOL ) काही जणांनी बीअर घेतली तर काहींनी झोप……

पहाटे गडाच्या पायथ्याशी म्हणजे पाचनयी गावाला पोहोचलो ., तिथे प्रत: विधी उरकले , फ्रेश होऊन मस्त चहा घेतला, आणि सर्वात सर्वात बेस्ट नाश्ता देखील,

तिथे काही रस्त्याचे काम करणारी माणसे थांबली होती , एका बाईने तव्यावर शेंगदाणे, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ याचा ठेचा बनविला, आम्ही एवढे निरखून ते बघत होतो कि त्या बाईने आम्हाला ठेचा भाकरी खायला दिली , :P मस्तच होता तो ठेचा …..

नाश्ता आणि चहा घेतल्यावर गड चढायला सुरुवात झाली., रस्त्यात jam - bread खाण्याचे ठरले . आणि फोटो काढत काढत सगळे गड चढू लागले . ( ट्रेक पेक्षा फोटो महत्वाचे असतात LOL , FB वर टाकायला ). ह्याची खेच, त्याची खेच , चढा-ओढ करत सगळे निघालो. मध्ये सगळ्यांनी सफरचंद खाऊन घेतली ( मुख्य उद्देश bag चे वजन कमी करणे) … आणि त्यानानातर आमचा अल्प विश्रांती चा stop होता झरा ( natural swimming pool देखील होता तिथे ) तिथे jam - bread खाऊन घेतला … आणि गड अवघ्या दोन ते अडीच तासांत सर केला . ( खरच पाचनयी चा मार्ग अगदीच सोपा होता )

गडावर पोचल्यावर तिथे राहत असलेल्या बद्रीनाथ ला आम्ही नेलेले जेवणाचे साहित्य देऊन आम्ही फ्रेश होण्या साठी तसेच मंदिरात जाण्यासाठी निघालो. तिथे गेल्यावर काहींनी आंघोळ केली तर काहींनी फक्त हात-पाय धुऊन घेतले. शंकराच्या देवळात नमस्कार करून आम्ही पुन्हा गुहेत आराम करण्यासाठी गेलो. अगदी दीड-दोन तास मस्त सगळ्यांनी आराम केला.

दुपारी बद्रीनाथ ने दिलेली खिचडी खाल्ली . सर्वाचे ठरले होते कि तारामती आणि कोकण कडा हे आजच करायचे , आणि उद्या सकाळी उतरण्यास सुरुवात करायची . पण नेमका दुपारी पाऊस सुरु झाला . मग तारामती आता करायचे कि फक्त कोकण कडा यावर वाद सुरु झाला., आणि as always सगळ्यांनी YZ ला शिव्या देत परंतु finally त्याचाच ऐकत फक्त कोकण कडा करायचे ठरले. actually त्याचे बरोबरच होते, पावसात तारामतीचा निसरडा रस्ता चढणे आणि उतरणे भारीच पडले असते ., आणि त्यात वेळेस कोकण कड्याचे रूप तर अगदीच झाकास्स्स्सस होते .

ह्यावेळेला प्रशांत बरोबर असल्याने सगळ्यांना फोटो लवकर मिळतील अशी मोठी आशा होतीच ( कारण YZ चे फोटो आम्हाला कधीच लवकर मिळत नाही ., मी तर असं ऐकलय कि आमच्या आधी काही पोरींना मागच्या पिकनिक चे pics मिळाले ), तसेच या वेलाला अंकुश कडेहि नवीन कॅमेरा होता ., कोकण कडा होताच तसा आठवणीत साठवून ठेवण्यासारखा ., त्या दर्या , वेगवेगळे डोंगर , ढग बनत होते, त्या सगळ्याचे वर्णन शब्दात करणे खरच फार कठीण आहे . अक्षरशः त्या दरीत सामाऊन जावेसे वाटत होते . वेगवेळ्या angle ने साग्ल्यानंनी फोटो काढून घेतले , ह्या वेळेस YZ तसेच प्रशांत कडे tri pod होता , आणि ह्या वेळेसही दरवर्षी प्रमाणे सुन्याने सर्वात जास्त फोटोज काढून घेतले LOL . जवळ-जवळ ३ तास आम्ही फक्त कोकण कड्यावर time pass केला bt it was worthy . मस्त तिथे चहा आणि भाजी चा आस्वाद घेतला . तिथे असलेल्या भास्कर नावाच्या माणसाने आम्हाला सांगितले कि तुम्ही कोकण कड्याच्या वाटेनेहि उतरू शकता, अगदी सोपा रस्ता आहे . &^&^$*^*%$&^%

परत गुहेत आल्यावर सगळ्यांनी आराम केला संध्याकाळी गाण्यांच्या भेंड्या खेळत तसेच ह्या वेळेचा target होता प्रसाद (last time राजगड वर तो न आल्याने फक्त किरण चीच खेचली होती ) आदी चा नेहमी प्रमाणे प्रसाद ची खेचण्यात पुढाकार होता . आणि ह्या वेळेस ट्रेकला केतन हि असल्याने मजा आली. मस्त एक – दीड तास मजा केली . बाहेर पाऊस पडतच होता अगदी विजेच्या कडकडाटासकट. थोडा वेळ पुन्हा सर्वांनी आराम केला

रात्री ९.३० च्या सुमारास जेवण झाल ( ह्या वेळच जेवण अजिबात ठीक नव्हते :( ) त्यानंतर सकाळी ६.३० लाच सर्वांना जग आली., सकाळी तारामती ( महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे उंच ठिकाण ) ला निघालो ., आम्ही काही जण YZ बरोबर पुढे निघालो ( चूक करतोय हे माहित असताना ) तिथेही जाताना मजा आली . एक तासात पोचलो . तिथेही photo session सुरु झालाच . मस्त पैकी खूप फोटो काढून झाले…. बाकी सर्व वरती आल्यावर सुन्या आणि सर्वांनी as expected शिव्या घातल्याच. सगळ्यांनी फोटो काढून घेतले . आणि परत गुहेत येऊन maggi चा नाश्ता केला (yummiii :P ). त्यानंतर “भास्कर” ने सांगितल्या प्रमाणे आणि YZ ला कोकण कड्याचे फोटोज काढायचे असल्याने आम्ही आलेल्या त्या रस्त्याने न जाता कोकण कड्याच्या रस्त्याने उतरण्याचे ठरवले,

कोकण कड्या वर गेल्यावर थोडे अजून फोटोझ काढून झाल्यावर भास्कर बरोबर गड उतरण्यास सुरुवात केली …. थोडा वेळ platue वर फिरून आम्ही उतरू लागलो … एका ठिकाणी गेल्यावर त्याने रस्ता दाखवला रस्ता जरा कठीणच होता . actually तो रस्ता धबधब्याचा होता. जाता जाता भास्कर म्हणाला ह्या रस्त्यावरून जाणारे तुम्ही पहिलेच, पण उतरताना वाटले कदाचित आम्ही शेवटचे ठरू……. :’( रस्ता खूपच कठीण होता .. पण परत जाण्याचाहि option नव्हता . त्यामुळे आम्ही उतरतच राहिलो ..

भास्करला शिव्या देत (तसेच YZ लाही शिव्या देत ) आम्ही त्या रस्त्याने उतरत होतो . दगडातून वाट काढत काढत रस्ता संपतच नव्हता .. मध्येच एके ठिकाणी त्या झरयाच्या रस्त्याचा उजव्या बाजूला जाण्यासाठी वाट दिसली .. सुरेश ती वाट आहे का हे बघून आला , आणि आम्ही त्या रस्त्याने उतरायचे ठरवले ( n that was right decsion) त्या रस्त्याने उतरल्यावर आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो . खाली आल्यावर थोडे अंतर चालल्यावर आम्ही आमच्या बस पाशी पोचलो आणि आमचा झाकास्स्स ट्रेक संपला

सरळ सध्या ट्रेक ला भास्कर ने रस्ता चुकवल्याने फारच मजा आली ( मजा हा शब्द फक्त उतरल्यावरच वापरलाय , तो पर्यंत आमची धडगत नव्हती … LOL

संक्षिप्त : ट्रेक चे ठिकाण : हरिश्चंद्र गड तारीख : १४ ऑक्ट २०११ रात्री ११.०० ते १६ ऑक्ट रात्री ११.००

सहभागी : जीवेश, सुनील, अंकुश, आदी, प्रसाद, कौस्तुभ, सुरेश, संतोष, केतन, प्रशांत, आणि मी .

P . S . : मी पहिल्यांदाच लिहित आहे , जर पकला असाल तर माफ करा , आणि पुढील लिंक वाचू नका in Short just BJ किव्वा UFO